गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना

 


🔶️ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील

शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विशेषत; पाण्यात बुडवून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळताना आथवा,  अन्य

 कारणांमुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा  वीज पडणे, उंचावरून पडुन झालेला अपघात,  सर्पदंश व विनचुदंश,  नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या,  जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा

 त्याच्या चाचण्यांमुळे जखमी किवा होणारे मृत्यु , दंगल , अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास  किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.


      🔶️      अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यकरिता शासनाकडून रू.2 लाख पर्यत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित योजने अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार


 म्हणून नोंद नसलेले कोणताही  1 सदस्य  ( आई , वडील,  शेतकऱ्याची पती , पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू होते.


   सदर योजनेच्या प्रयोजनारथ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले 1 सदस्याचे आई , वडील,  शेतकऱ्याची पती , पत्नी,  मुलगा व अविवाहित मुलगी याचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. 


🔶️ कृषि गणनेनुसार  निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य असे एकुण 2 जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ असतील. 


🔶️अपघाताची बाब

◾️अपघाती मृत्य - रूपये 2,00,000/-

◾️अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - रू.2,00,000/-

◾️अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे.-    2,00,000/-

◾️अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे - रू 1,00,000/-



Comments

Popular posts from this blog

उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ पर्मनंट भरती

गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना